Addurl.nu 1Abc Directory

Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पृथ्वीचे अंतरंग

 

 पृथ्वीचे अंतरंग


पृथ्वीचे अंतरंग :

  • अभ्यास भुरूपशास्त्रामध्ये

  • अंतरंगावर भुपृष्ठाची रचना अवलंबून

  • पृथ्वी कठीण पोलादी गोळ्या सारखी

  • अंतर्गत भागात द्रवरूप पट्टा 

  • अंतर्गत भागातील दाब कमी झाल्यास धनपदार्थ वितळून शिलारस तयार होतो.

  • पृथ्वी उत्सर्जन प्रक्रिया होऊन स्वता भोवती फिरता फिरता थंड झाली

  • थंड होण्याची ही क्रिया पृष्ठभागापासुन केंद्राच्या दीशेने 

  • लाव्हारस थंड झाल्यावर अग्निजन्य खडक तयार होतात खाणीमध्ये वरून खाली गेल्यास तापमान वाढते
  •  अंतभाग उष्ण व प्रवाही

  • अभ्यासासाठी मानवाने विंचन छिद्रे पाडली 
  • पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी


पृथ्वीच्या अंतरंगाची रचना

शिलावरण/कवच (Lithosphere / Crust):

  • पृथ्वीच्या सर्वांत वरच्या बाह्य घनरूपास शिलावरण असे म्हणतात.         
  • शिलावरणाचा 29 टक्के भाग भूमीने व 71 टक्के भाग जलाने व्यापलेला आहे.
  • शिलावरणाची जाडी 16 ते 40 कि.मी.
  • सरासरी जाडी 33 कि.मी. 
  • ही जाडी सर्वत्र सारखी नाही. 
  • हिमालय, रॉकीसारख्या पर्वतश्रेण्यांखाली ही जाडी 40 कि.मी. पेक्षा थोडी जास्त आढळते. 
  • महासागराखाली ती 10 कि.मी. पेक्षा कमी जाड आहे.
  • भारताच्या मैदानी प्रदेशात कवचाच जाडी सुमारे 3 कि.मी. आढळते.

शिलावरणाचे 'सियाल' व 'सिमा' असे दोन थर आहेत.

1) सियाल  : 

  • भूपटलाच्या सर्वात वरच्या घन थरास 'सियाल' असे म्हणतात. 

वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

  • मूलद्रव्ये :भूखंडे प्रामुख्याने सियालची बनलेली    आहेत.Si म्हणजे सिलिका व Al म्हणजे        अॅल्युमिनिअम. 
  • खडक : ग्रॅनाइटसारख्या अधिसिलिक (Acid) व अवसादी (जलजन्य) खडकापासून सियाल बनलेला असून काही ठिकाणी बेसाल्ट खडकदेखील आढळतो.
  • जाडी : भूखंडाखाली सियाल थराची जाडी 29 कि.मी. असावी.
  • घनता : सियालची घनता 2.65 ते 2.77 एवढी आहे.
  • भूकंप-लहरींचा वेग : प्राथमिक लहरी सेकंदाला 5.6 कि.मी. दुय्यम लहरी दर सेकंदाला 3.2कि.मी.  वेगाने सियाल थरातून प्रवास करतात.

2) सिमा : 

  • सियाल थराच्या खालील थरास सिमा असे 

वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

  • मूलद्रव्ये : सामान्यतः महासागरतळ सिमाचे बनलेले आहे. Si म्हणजे सिलिका व Ma म्हणजे मॅग्नेशिअम या दोन रासायनिक मूलद्रव्यांनी सिमा थर बनलेला आहे.
  • खडक: सिमा थरात बेसाल्ट खडक आढळतात. हा मध्य सिलिका व अल्प सिलिका सायनाइट ते गॅब्रो खडकांनी बनलेला आहे. 
  • जाडी: महासागराखाली 3 ते 5 कि.मी. तर भूखंडाखाली 13 कि.मी. आहे.म्हणजे शिलावरणाचा थर 42 कि.मी

  • घनता: सिमाची घनता 2.85 ते 3.3 ग्रॅम/ घन सें.मी. आहे.
  • सियाल थराचे सिमा थरावर तरंगणे : सामान्यतः सियालची भूखंडे सिमाच्या अधिक घनतेच्या सागरतळावर तरंगत आहेत.
  • भूकंप-लहरींचा वेग : सिमा थरात भूकंपाच्या प्राथमिक लहरी दर सेकंदाला 6 ते 7.2 कि.मी. वेगाने तर दुय्यम लहरी दर सेकंदाला 3 ते 4 कि.मी.


प्रावरण / मध्यावरण (Mantle) प्रावरण:

  • शिलावरणाच्या खालील थरास प्रावरण असे म्हणतात.
  • जाडी प्रावरणाची जाडी सुमारे 2,865 कि.मी.  खोलीनुसार विस्तार 33 कि.मी. ते 2,900 कि.मी. पर्यंत आहे.
  • धनता:  प्रावरणाच्या वरील भागातील घनता 3.1. आतील भागातील घनता5.57 ग्रॅम / घन सें. मी. 
  • खनिज द्रव्ये : खनिजात्मकदृष्ट्या हा भाग ऑलिव्हिन पायरॉक्सीनने युक्त असलेल्या एक्लोगाईटसारख्या पदार्थांनी बनलेला आहे.  
  • क्षेत्रफळ व वस्तुमान: पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी प्रावरणाने 83 टक्के भाग व्यापलेला आहे. पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी प्रावरणाचे वस्तुमान 68 टक्के आहे.

प्रावरणाचे  प्रमुख थर पुढीलप्रमाणे आहेत :

1)  बाह्य प्रावरण : 

  • यांचा विस्तार अंतरंगात 42 ते 700 कि.मी. खोलीवर आढळतो.
  •  खनिज द्रव्ये : प्रावरणात ऑलिंकिन 60 ते 70 टक्के व पायरॉक्सिन 15 ते 20 टक्क्यांपर्यंत असते. हेच प्रमाण उल्काच्या बाह्य भागात आहे.
  • ज्वालामुखीय प्रक्रिया घडून येण्यास हेच आवरण कारणीभूत असावे असे मानले जाते.
  • शिलारसाच्या उत्पनीशी याच घराचा संबंध असावा.
  • पृथ्वीवर समस्थायी समायोजन घडून येण्यास हाच थर कारणीभूत असावा असे मानले जाते. पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीचे उगमस्थान 'प्रावरण' हेच मानले जाते.
  • प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळेच भूखंड वहन, सागरतळ विस्तार, पर्वत निर्माणकारी हालचाली व भूकंप होत असावेत.

2) आंतप्रावरण :

  • पृथ्वीच्या अंतरंगात सुमारे 700 ते 2,900 कि.मी. आंतप्रवरण आढळते.
  • आंतप्रवरणामध्ये अधिक घनतेची सिलिका द्रव्ये व विविध ऑक्साइड्स आहेत. अशाच प्रकारची द्रव्ये उल्काच्या अंतर्भागात आहेत.

गाभा (Core) :

  • अंतरंगात सुमारे 2,900 कि.मी. ते 6,371 कि.मी. पर्यंत म्हणजे पृथ्वीच्या केंद्रबिंदूपर्यंतच्या पृथ्वीच्या अंतरंगास 'गाभा' असे म्हणतात.

 गाभ्याचे थर गाभ्याचे दोन थर आहेत 

 1) बाह्य गाभा : 

  • अंतरंगात 2,890 कि.मी. (सुमारे 2,900 कि.मी. ते 5,150 कि.मी.) पर्यंतच्या पृथ्वीच्या अंतरंगास गाभा असे म्हणतात.
  • द्रवरूप बाह्य गाभ्यातून दुय्यम भूकंप-लहरी जाऊ शकत नसल्याने हा भाग द्रवरूप असावा असे मानले जाते.
  • घनता बाह्य गाभ्याची घनता गटेनबर्ग विलगतेजवळ 10 आहे तर आंतरिक गाभ्याजवळ 12.3 ग्रॅम/ घन सें.मी. आहे.

 2) आंतरिक गाभा : 

  • अंतरंगात 5,150 कि.मी. ते 6,371 कि.मी. म्हणजे पृथ्वीच्या केंद्रबिंदूपर्यंतच्या अंतरंगास आंतरिक गाभा म्हणतात.

वैशिष्टये :

  • घन अवस्था: गाभ्याच्या बाह्य थराखालील आंतरिक गाभा अगदी केंद्रबिंदूपर्यंत घन अवस्थेत आहे, असे अनुमान काढण्यात आले आहे.
  •  घनता : आंतरिक गाभ्याची घनता 13.3 पासून 13.6 ग्रॅम / घन सें.मी. पर्यंत वाढत जाते.
  • गाभ्यातील खनिजपदार्थ व त्यांचे स्वरूप : हा भाग अतिशय कठीण अशा खनिजद्रव्यापासून तयार झालेला आहे. यात निकेल (Ni) व लोह या धातूंचे मिश्रण असल्याने त्यास 'निफे' (Nife) असे म्हणतात.
  • पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी व नंतर आकुंचन पावत असताना लोहसंयुगाचे रूपांतर धातूमध्ये व सिलिकेटचे रूपांतर सिलिकॉनमध्ये झालेले असावे
  • बाह्य भागात लोह निकेल 80 टक्के आणि सिलिकॉन 20 टक्के आहे.
  •  गाम्याचे घनफळ, वस्तुमान व घनता पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी 16 टक्के घनफळ व एकूण वस्तुमानापैकी 32 टक्के वस्तुमान गाभ्याचे
  •  गाभ्याची सरासरी घनता प्रावरणाच्या सरासरी धनतेपेक्षा दुप्पट आहे.
  • अंतर्गत भागात तापमान 100 मीटर खोलीवर 3° से. याप्रमाणे वाढत जाते. 
  • कवचाखाली 30 कि. खोलीवर 500° से. 
  • 200 कि.मी. खोलीवर प्रावरणात 1400° से.
  • 1000 कि.मी. खोलीवर 1700° से.
  • गाभ्यात 3000 कि.मी. खोलीवर 2300° से. जो Tectonics) असे म्हटले जाते. 
  • भूकेंद्रालगत 6000 कि.मी. खोलीवर 2500° से. पेक्षा जास्त तापमान आढळते.
  •  अंतर्गत भागात खोलीनुसार दाब वाढत जातो. 
  • 2500 कि.मी. खोलीवर 10 लाख वातावरणाच्या वजनाएवढा
  •  3500 कि खोलीवर 20 लाख वातावरणाच्या वजनाएवढा 
  • पृथ्वीच्या केंद्राजवळ 35 लाख वातावरणाच्या वजनाएवढा दाब आढळतो.


कॉनरॅड विलगता (खंडत्व) (Conrad Discontinuity) : 

  • सियाल व सीमा यांना विलग करणाऱ्या प्रदेशास कॉनरॅड विलगता (खंडत्व)  असे म्हणतात.

मोहो विलगता (खंडत्व) (Moho Discontinuity) :

  • सिमा थराच्या खाली भूकवच व प्रावरण यांना विलग करणारी 'मोहो विलगता (खंडत्व).
  • मोहोरोव्हिसीक शास्त्रज्ञाने ती शोधून काढली, म्हणून त्यांच्या नावाने ही ओळखली जाते.
  •  भूकंप-लहरींपैकी 'P' लहरींची गती ज्या भागात एकदम वाढते, त्याला 'मोहो विलगता (खंडत्व)' असे म्हणतात. 
  • सागरतळाखाली 10 ते 12 कि.मी. खोली' होते. 
  • S लहरी मोहो विलगता आढळते, तर भूखंडाखाली त्याची खोली 35 कि.मी. वर असते.

गटेनबर्ग विलगता (खंडत्व) : 

  • प्रावरण व गाभा यांच्या सीमावर्ती प्रदेशास गटेनबर्ग विलगता (खंडत्व) असे म्हणतात.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या